तो आणि मी

1 min read

तो आहे एक दिवा
आणि मी त्याची वात,
तो तेवत असतो रोजच
मी देते त्याला साथ!
तो आहे एक वादळ,
आणि मी त्याची झुळूक,
तो असतो माझ्यापुढे
मी जाते मागून हळूच !
तो आहे निळं आकाश
आणि मी त्याची धरती,
भेटत असतो आम्ही
रोज त्या क्षितिजावरती ।
तो आहे 'सूर्य'
तर मी 'प्राजक्ताचे फूल',
त्याच्या एका कवडेशाने
जाते मी दिपून!
तो आहे कृष्ण
आणि मी त्याची राधा,
जगतेय मी त्याच्यासाठीच
तोच खास माझा !!!
प्राजक्ता
0
Subscribe to my newsletter
Read articles from Prajakta Kulkarni directly inside your inbox. Subscribe to the newsletter, and don't miss out.
Written by
