जगदाळे सर..


एक आदरणीय व्यक्तिमत्व, अलौकिक बुद्धिमत्ता आणि विचारांची परिपक्वता ...
ते आहेत आमचे जगदाळे सर..!
काठोकाठ आहे ज्यांची ज्ञानाची होडी, ज्यांच्यामुळे सुटली अनेक अवघड कोडी,
ज्यांच्यामुळे लागली गणिताची गोडी,
ते आहेत आमचे जगदाळे सर..!
गालातल्या गालात हळूच हसणारे,गणितीय हिशोबात पक्के असणारे,
पण मायेचा हिशोब कधीही न करणारे,
ते आहेत आमचे जगदाळे सर..!
स्वभाव ज्यांचा संयमी व शांत,कामातून कधीही घेत नाहीत उसंत,
"मुलांनी अभ्यास न करणे" ही एकच ज्यांची खंत ,
ते आहेत आमचे जगदाळे सर..!
मदतीला तत्पर व प्रचंड कष्टाळू, मनाने निर्मळ व अतिशय कनवाळू,
ते आहेत आमचे जगदाळे सर..!
अध्ययनाचे मार्गदर्शक, आयुष्याचे दिशादर्शक,
आणि एक आदर्श शिक्षक ...
ते आहेत आमचे जगदाळे सर..!
--प्राजक्ता
Subscribe to my newsletter
Read articles from Prajakta Kulkarni directly inside your inbox. Subscribe to the newsletter, and don't miss out.
Written by
